दापोलीतील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू  

आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्स्झिको वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे.

बांकुरा (बंगाल) येथे २ मालगाड्यांच्या धडकेने १२ डबे घसरले !

रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्‍या मालगाडीला मागून आलेल्या दुसर्‍या मालगाडीने दिली धडक !

मुंबईत महामार्गावर घोड्यांची शर्यत लावणार्‍या चौघांना अटक !

या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे. इतर वाहनेही या महामार्गावरून धावत होती. या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. अन्‍यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

परळ येथे चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र खाली कोसळले !

कमला मिल येथील ट्रेड वर्ल्‍ड या १६ मजली इमारतीमध्‍ये चौथ्‍या माळ्‍यावरून उद़्‍वाहन यंत्र (लिफ्‍ट) खाली कोसळले. यामध्‍ये ९ जण घायाळ झाले. त्‍यांना जवळच्‍या रुग्‍णालयांत भरती करण्‍यात आले आहे. घायाळ झालेल्‍यांची प्रकृती स्‍थिर आहे.

टायटॅनिक नौकेचे अवशेष पहाण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता !

‘टायटॅनिक’ ही महाकाय प्रवासी जहाज अटलांटिक महासागरातील एका हिमनगाला धडकल्याने बुडाले होते. त्याचे अवशेष पहाण्यासाठी लोकांना घेऊन जाणारी पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली.

कर्नाटकातील शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात २ ठार !

येथे विश्व हिंदु परिषदेच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शिवापूर येथून बेळगावकडे येणार्‍या अल्टो वाहनाने समोर निघालेल्या कंटनेरला मागून धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणार्‍या दुसर्‍या एका कंटनेरने धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार, तर शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी हे गंभीर घायाळ झाले आहेत.

अल्‍पवयीन मुलाने चारचाकी चालवतांना झालेल्‍या अपघातात २ जण ठार !

१४ जूनला पहाटे अल्‍पवयीन मुलाने गंमत म्‍हणून वडिलांनी सेडन गाडी चालवायला घेतली. हा मुलगा भोईवाड्याहून नरीमन पॉईंटच्‍या दिशेने निघाला. गिरगाव चौपाटीजवळ नजीक कॅफे आयडियलजवळ दुचाकीला जोरात धडकल्‍याने अकबर दाऊद खान (४७) आणि किरण अन्‍वर खान (३६) हे ठार झाले आहेत.

जगात प्रतिदिन होतात साडेतेरा लाख रस्ते अपघात !

जगात प्रतिदिन रस्ते अपघातांमध्ये साधारण ३ सहस्त्र ७०० लोक जीव गमावतात. तसेच प्रतिदिन सरासरी साडेतेरा लाख रस्ते अपघात होतात. यांतर्गत सर्वांत सुरक्षित रस्ते आणि चालक कोणत्या देशात आहेत, याचा ऑस्ट्रेलियातील आस्थापन ‘कम्पेअर मार्केट’ने अभ्यास केला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ भरधाव वेगाने  रसायन घेऊन जाणारा टँकर दुपारी पलटी होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत.