डोडा (जम्मू-काश्मीर) – येथे एक बस ३०० फूट खोली दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला. ही बस किश्तवाड येथून जम्मूकडे जात होती. या घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि अन्य यंत्रण यांनी साहाय्यता कार्य चालू केले. घायाळांना बाहेर काढण्यात येत आहे. घायाळांची स्थिती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार या मार्गावर ३ बस एकत्र जात होत्या आणि त्या एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या त्या वेळी हा अपघात झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.