सुरत (गुजरात) – येथील रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यामुळे ५ जण बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर यातील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य ४ जणांवर उपचार चालू आहेत. मृत व्यक्तीचे नाव वीरेंद्र सिंह असे असून तो बिहारच्या छपरा येथील रहाणारा आहे. तो सुरत येथे कामाला होता. दिवाळी आणि छठ पूजा यांमुळे गुजरातच्या सर्व रेल्वे स्थानकांवर बिहारला जाणार्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून उत्तरप्रदेश आणि बिहार यांकडे जाणार्या गाड्यांची संख्या अल्प असल्याने प्रवाशांना प्रतिवर्षी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. (प्रतिवर्षी अशी स्थिती निर्माण होत आहे, तर रेल्वे प्रशासन अधिक गाड्या का सोडत नाही ? – संपादक)
संपादकीय भूमिकारेल्वे स्थानकावर सणांच्या वेळी, तसेच तीर्थयात्रेच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासन का करत नाही ? |