हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे भोर (पुणे) येथे निवेदन !

भोर (जिल्हा पुणे) – पू. संभाजीराव भिडेगुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्यांचा ‘मास्टर माईंड’ (मुख्य सूत्रधार) शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ७ मार्च या दिवशी भोर येथील तहसीलदार अजित पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री धारकरी नीलेश आवाळे, अतुल काकडे, रोहित देशमाने, मनसेचे शशिकांत वाघ, भाजपचे अध्यक्ष भोर तालुका युवा वॉरियर्सचे रोहन भोसले, व्यसनमुक्ती महासंघाचे पांडुरंग पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे विश्वजीत चव्हाण आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी निवेदने का द्यावी लागतात ? प्रशासन स्वतःहून पुढाकार का घेत नाही ? |
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ घोषित !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान