मराठी भाषेचा अभिमान बाळगणे आवश्यक ! – अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे

या निमित्ताने कवी केशवसूत स्मारक येथे ‘मराठी भाषेचे संवर्धन आणि शासनाची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन तसेच ‘मराठी भाषा संवर्धनासाठी लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधितांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सरकारने आमच्या जमिनी परत कराव्यात किंवा आजच्या बाजारभावाप्रमाणे जमिनींचा मोबदला शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकरीसंघाने केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

कोकणातील मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पावसाळ्याच्या आरंभीच म्हणजे जूनमध्ये या बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

तोतया पोलिसांचा टोळीने रत्नागिरी आणि चिपळूण येथील २ वृद्धांना लुटले

पोलीस असल्याचे खोटे सांगून रत्नागिरी आणि चिपळूण येथे २ वृद्धांना लुटल्याच्या घटना ! याप्रकरणी रत्नागिरीत ३ जणांच्या, तर चिपळुणात २ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या चोरांनी वृद्धांच्या अंगावरील दागिने लुटले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ घोषित करण्याची देवरुखवासियांची मागणी

या मागणीसाठी स्वाक्षर्‍यांचे निवेदन शासनापर्यंत पोचवण्यासह प्रसंगी याच चौकात आंदोलन करण्याची सिद्धताही उपस्थितांनी दर्शवली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाने हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे महत्कार्य केले ! – दिलीप गोखले, रा.स्व. संघ

भारत, ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे, तो म्हणजे हिंदू. केवळ भारतात जन्म झाला अथवा त्याचे आई-वडील येथे रहातात म्हणून तो हिंदु होत नाही.

रत्नागिरी : मालगुंड येथे मराठी लोककलेवर आधारित कार्यक्रम

या कार्यक्रमामध्ये ‘मराठी भाषेतील लोककला’ यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.

रत्नागिरी : वाटद सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

सरपंचपदाच्या कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका येथील स्थानिक व्यापार्‍यांना बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले होते.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित !

देशभरातील ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने लांजा (जि. रत्नागिरी) येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन !

शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.