Rajasthan Police Constable Attacked : महंमद बशीर याने पोलीस हवालदारावर केले चाकूने आक्रमण !

महंमद बशीरचे पोलीस ठाण्यासमोर पोलीस हवालदारावरच चाकूने आक्रमण !

जयपूर (राजस्थान) : टोंक जिल्ह्यातील कोतवाली नगर भागात महंमद बशीर नावाच्या एका मुसलमान तरुणाने पोलीस ठाण्यासमोर पोलीस हवालदारावर चाकूने आक्रमण केले. या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

प्रसारमाध्यमाने दिलेल्या एका वृत्तानुसार टोंक जिल्ह्यातील कोतवाली नगर भागात रहाणार्‍या सद्दाम उपाख्य महंमद बशीर याला उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहाण्याची नोटीस मिळाली होती. ही नोटीस मिळाल्यावर सद्दाम याने रागाच्या भरात पोलीस ठाणे गाठले. प्रवेशद्वारावर एक पोलीस हवालदार उभा होता. सद्दाम याने त्याला विचारले, ‘माझ्याबद्दल कोणी तक्रार केली आहे ? मी त्याला सोडणार नाही.’ पोलीस हवालदार काही उत्तर देण्यापूर्वीच सद्दामने त्याच्यावर चाकूने आक्रमण केले.

संपादकीय भूमिका

पोलिसांवर आक्रमण करण्याइतपत उद्दाम झालेले मुसलमान !