वाळपई येथील गोप्रेमींमुळे उघडकीस आला प्रकार
फोंडा, १२ डिसेंबर (वार्ता.) – फोंडा पोलिसांनी बोरी पुलाजवळ धाड घालून एका वाहनातून अवैधपणे वाहतूक करण्यात येत असलेले सुमारे २ टन गोमांस कह्यात घेतले. नियम धाब्यावर बसवून, अस्वच्छ पद्धतीने आणि वातानुकूलन यंत्रणा न वापरता किंवा बर्फात न ठेवता गोमांसाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोमांसाने भरलेला जी ए ०८ व्ही ३८९६ हा ट्रक आणि २ जण यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (गोमांसाची वाहतूक करणार्या वाहनांची अनुज्ञप्ती रहित होईल, असा कायदा करायला हवा ! – संपादक) हे गोमांस कुठून आणले ? यासाठी गोवंशाची हत्या कुठे करण्यात आली ? यांविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. प्राप्त माहितीनुसार वाळपई येथील गोप्रेमींनी काही ग्रामस्थांना समवेत घेऊन ट्रकचा पाठलाग केला. ट्रक अडवून आतमध्ये तपासणी केली असता त्यांना आतमध्ये गोमांस आढळले. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.