रत्नागिरी लाचलुचपत विभागाची कारवाई !
रत्नागिरी – येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एका तक्रारदाराने केलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर तालुक्यातील देवळे मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय ४६ वर्षे) आणि सजा कानाकडी तलाठी संतोष महादेव मोघे या दोघांना २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार (वय २९ वर्षे) यांची वडिलोपार्जित शेतभूमी मिळकतीवर तक्रारदार यांचे सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करून ते संमतीसाठी पाठवण्याकरता यातील आलोसे (आरोपी लोकसेवक) क्र. २ तलाठी संतोष महादेव मोघे यांनी २८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी भ्रमणभाषची मागणी केलेली असून ही नोंद संमत करण्याकरता आरोपी क्रमांक १ आलोसे (आरोपी लोकसेवक) मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी २८ फेब्रुवारी आणि १३ मार्च २०२३ या दिवशी २५ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. ती लाच २५ सहस्र रुपये मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी २९ मार्च या दिवशी दुपारी १ वाजून ४३ मिनिटांनी स्वीकारली असता त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपी मोघे आणि मुरुडकर या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई चालू करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईच्या या पथकामध्ये पोलीस निरीक्षक प्रवीण ताटे, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक दीपक आंबेकर, पोलीस कर्मचारी हेमंत पवार, राजेश गावकर आणि प्रशांत कांबळे यांचा समावेश होता, तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री. सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी काम पहिले. मार्गदर्शन अधिकारी म्हणून सुनील लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि ठाणे परिक्षेत्र आणि अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र हे होते.
संपादकीय भूमिका
|