महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने बाळशास्त्रींचे कार्य आणि विचार नव्याने लोकांसमोर आणले ! – डॉ. तानाजीराव चोरगे

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरण आणि स्मारक कार्यात देणगी देऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सामाजिक बांधीलकी दाखविली आहे.

रत्नागिरी सीए शाखेच्या वतीने ‘प्रोफेशनल इथिक्स’, ‘प्रोफेशनल अपॉर्च्युनिटी’ कार्यशाळेला प्रतिसाद

रेरा सर्टिफिकेट्स देतांना बांधकाम खर्च, निवासी सदनिका धारकांकडून येणारे पैसे, तसेच विक्री न झालेल्या सदनिकांचे मूल्यांकन याची माहिती कशी द्यावी, याविषयी सखोल विवेचन केले.

 चिपळूण ते डेरवण रुग्णालयापर्यंत रुग्णांसाठी विनामूल्य बससेवा चालू

डेरवण रुग्णालय अनेक रुग्णांचा आधार बनले आहे. एकाच रुग्णालयात रुग्णाला आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच योग्य उपचार मिळावेत, यासाठी विनामूल्य बस सेवेचा निर्णय घेतला आहे.

 रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

प्रत्येक पावसाळ्यात परशुराम घाटात दरड कोसळण्याची घटना घडते. आता घाटात नवीन बांधलेली संरक्षक भिंतच कोसळल्याने ठेकेदार आस्थापनाने निकृष्ट काम केले नाही ना ? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे !

रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार !

लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी ते आरवली महामार्गावर दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामात केली जात आहे जनतेची फसवणूक !

कशेडी ते आरवली या दरम्यान महामार्गाचे रुंदीकरणांतर्गत सुमारे २० सहस्र झाडे तोडण्यात आली होती. या झाडांमध्ये बहुतांश झाडे जांभूळ, आंबा, वड अशी काही स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखणारी झाडे होती.

मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल घोषित

अधिक माहिती घेण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिट्यूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी.

बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा ! – श्रीकांत हावळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा संपवून बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्याकरता आपल्या परिसरामध्ये कुठेही बालकामगार दिसल्यास ‘चाईल्ड हेल्पलाईन’ क्रमांक १०९८ वर संपर्क साधावा.