|

राजापूर – तालुक्यातील पन्हळे तर्फे येथील अनधिकृत मदरशाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून साखळी उपोषण चालू केले आहे. हे उपोषण सलग चौथ्या दिवशी म्हणजे २९ जानेवारीलाही चालू आहे. या मदरशावर कारवाई करण्यास प्रशासनाला अपयश आल्यामुळे स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘जोपर्यंत अनधिकृत मदरसा बंद केला जात नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही’, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थ आणि उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आता या उपोषणाला संपूर्ण तालुक्यातूनही पाठिंबा मिळत आहे. या अनधिकृत मदरशाच्या विरोधात प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याची चेतावणी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीनेही प्रशासनाला देण्यात आली आहे.
घटनाक्रम…
१. ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही अनुमती न घेता पन्हळे तर्फे राजापूर येथे एके ठिकाणी मदरसा चालू करण्यात आला. या मदरशामधील मुलांचा गावात राजरोसपणे वावर चालू झाल्यानंतर ग्रामस्थांनी याविषयी प्रशासनाकडे तक्रार केली होती.
२. ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशीच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी या अनधिकृत मदरशाला तीव्र विरोध दर्शवत तो बंद करण्याचा ठराव बहुमताने संमत केला.
३. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित मालकाला १५ दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले; मात्र मालकाने कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत, तरीही या मदरशावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
४. याविषयी पोलीस प्रशासनालाही माहिती देण्यात आली असतांनाही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.
५. याविषयी आता २६ जानेवारी २०२४ लाही उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते; मात्र कारवाई करण्यात आली नाहीच. आता २६ जानेवारी २०२५ पासून हे उपोषण केले जात आहे.
६. मदरसाप्रकरणी समिती अहवालावर चर्चा चालू असून प्रशासन कारवाई करेल. तोपर्यंत आपण उपोषण मागे घ्यावे, असे पत्र नुकतेच उपोषणस्थळी गेलेल्या राजापूर तहसीलदारांना उपोषणकर्त्यांनी परत पाठवले होते.

७. जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद केल्याचे लेखी पत्र प्रशासनाकडून देण्यात येत नाही तोपर्यंत आमची माघार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.
८. उपोषणकर्त्याच्या या भूमिकेमुळे प्रशासनाकडून आता याविषयी बैठका घेणे चालू झाले आहे.
संपादकीय भूमिका
|