“जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांना ‘मराठा समाजरत्न’ पुरस्कार

रत्नागिरी – अखिल भारतीय मराठा महासंघ, रत्नागिरीच्या वतीने कीर्तन महोत्सव आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांना ‘मराठा समाजरत्न’ पुरस्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता चिपळूण येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मराठा महासंघाला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त समाजासाठी आदर्शवत असलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या अंतर्गत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घेण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या अंतर्गत १३ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सुदर्शन शिंदे यांचे शिवव्याख्यान,  तसेच रात्री ८ वाजता कबीर महाराज यांचे कीर्तन आहे. १४ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता प्रा. नामदेवराव जाधव यांचे शिवव्याख्यान, ६ वाजता सत्कार सोहळा आणि रात्री ८ वाजता ज्ञानेश्वर महाराज वाभले यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.