सिंहगड रस्ता, धायरी (पुणे) आणि नांदेड फाटा या परिसरात फटाक्यांची अवैध दुकाने

पोलिसांनी केवळ नोटीस बजावली; पण दुकानदारांवर पुढची कारवाई कधी करणार ? तोपर्यंत दुर्घटना घडली तर त्याला कोण उत्तरदायी ?

पुणे येथे अवैधरित्या गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना अटक !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही त्याची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळेच गोहत्या थांबत नाहीत !

अग्निहोत्राचा प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांचा देहत्याग !

प्रतिदिन अग्निहोत्र करणारे आणि अग्निहोत्राचा भारतासह विदेशातही प्रसार करणारे प.पू. स्वामीमय सद्गुरु दादाश्री मोहन जाधव (वय ८० वर्षे) यांनी पुणे येथे २६ ऑक्टोबर २०२१ या रात्री ११ वाजता देहत्याग केला.

१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर लोहगाव विमानतळाची सेवा चालू !

१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर विमानसेवा चालू होत असल्याने विमान सेवेचे दरही वाढले आहेत. विमानांची वाहतूक सेवा चालू झाल्याने विमानतळ प्रशासनाने हिवाळ्यातील उड्डाणांचे वेळापत्रक लागू केले आहे.

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे पोलीस कर्मचार्‍याला लाथाबुक्क्याने मारहाण !

पोलीसच स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ असतील, तर ते जनतेचे रक्षण काय करणार ?

‘दि पुणे पोस्टस् अँड टेलिकॉम सहकारी पतसंस्थे’च्या २३ संचालकांवर गुन्हा नोंद !

असे भ्रष्ट पदाधिकारी असलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींच्या प्रवेशाचे निःपक्षपणे स्वागत करा ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

‘पुरुष छात्रांप्रमाणे महिलाही चांगली कामगिरी करतील’, असा विश्वास सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला. ‘महिलांच्या प्रवेशामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने प्रबोधिनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे’, असेही ते म्हणाले.

देशाची राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी शत्रूदेशातील समाजाला लक्ष्य करणे हा शाश्वत पर्याय ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भविष्यातील युद्धनीती नागरिक केंद्रित असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ! असे बचावात्मक भूमिकेत राहण्यापेक्षा आक्रमणाचा पर्याय भारत कधी निवडणार ?

गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून पुणे येथे वसुबारस आणि दिवाळी यांनिमित्त ‘गोमय दिवाळी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदे’चे आयोजन !

‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समुहाच्या माध्यमातून पुणे येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकांची आवश्यकता असू शकत नाही ! – ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर 

शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.