पुणे – येथील देहूरोड येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात पहारा करत असलेल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचार्याला लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. (पोलीसच स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ असतील, तर ते जनतेचे रक्षण काय करणार ? – संपादक) मारहाणीचे सी.सी.टी.व्ही. चित्रीकरण मिळाले असून मारहाण करणार्या अरविंद ढिल्लोड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.