दौंड (जिल्हा पुणे) येथील दत्त मंदिरातील साहाय्यक व्यवस्थापकानेच दानपेटीतील पैसे चोरले !

मंदिराचे व्यवस्थापकच मंदिरात चोरी करतात, यातून हिंदूंचे किती प्रमाणात पतन झाले आहे, हे लक्षात येते. ही दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !

पुण्यात गुन्हेगारी वाढत असतांनाही संमत केलेली ६ नवीन पोलीस ठाणी अद्याप कागदावरच !

बाणेर, खराडी, वाघोली, नांदेड सिटी या नवीन पोलीस ठाण्यांना संमती मिळाली आहे. हडपसर आणि लोणी काळभोर या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून काळेपडळ, फुरसुंगी ही नवीन पोलीस ठाणी चालू करण्यास संमती मिळाली आहे.

पुणे येथील महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरात चोरी

डोबरवाडी (घोरपडी) येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून २ सहस्र रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ सहस्र ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

कोंढव्यातील (जिल्हा पुणे) ‘साखळी’ पशूवधगृहावर धाड टाकून १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त !

प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?

भारत आणि बांगलादेश येथे चाललेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपचा ठाणे येथे मूक मोर्चा !

भारत आणि बांगलादेश येथे होणार्‍या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने ठाणे येथे मूक मोर्चा काढण्यात आला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचून निषेध व्यक्त व्हावा, या उद्देशाने २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता या मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.

परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून समन्स !

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित रहाण्याविषयी समन्स (सूचना) दिले आहे.

केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

गेल्या १५ वर्षांत अनुमाने ६५ साखर कारखाने विकले गेले किंवा ते इतरांना चालवायला दिले गेले; मात्र त्याविषयी कुणी काहीच बोलत नाही, असा आरोप करत ‘केंद्रीय यंत्रणेने काम करतांना सर्वांना समान न्याय लावावा’, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

उरुळी कांचन (जिल्हा पुणे) येथे भरदिवसा केलेल्या गोळीबारात दोघे ठार, तर दोघे घायाळ !

उरुळी कांचन येथील सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर २२ ऑक्टोबर या दिवशी भरदुपारी सोनवणे यांच्या टोळीतील ४ – ५ जणांनी वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर आक्रमण करून गोळीबार केला. त्यात जगताप हे ठार झाले असून त्यांचे २ सुरक्षारक्षक गंभीररित्या घायाळ झाले….

पुण्यातील ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या जप्त !

येथील ‘समृद्ध जीवन’ आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्वीफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील दस्तऐवज खराब झाल्याचा दावा !

‘संबंधित अधिका‍र्‍यांची माहिती उघड होऊ नये, यासाठीच ही कृती केली आहे’, असे लोकांच्या मनात आल्यास चुकीचे काय ? अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना वेळीच बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी !