गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून पुणे येथे वसुबारस आणि दिवाळी यांनिमित्त ‘गोमय दिवाळी राष्ट्रीय गोसंवर्धन परिषदे’चे आयोजन !

राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद

पुणे – ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ समुहाच्या माध्यमातून राज्यातील १०० हून अधिक गोपालक संस्थांचा समूह ‘गोसंवर्धन महासंघ’ म्हणून राज्यात कार्य करत आहे.  गोसंवर्धन आधारित रोजगार निर्मिती, गोसंवर्धन आधारित कृषी व्यवस्था, चिकित्सा व्यवस्था इत्यादी विषयी प्रचार व्हावा, तसेच गोविज्ञानाविषयी सर्वांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी गोसंवर्धन महासंघाच्या माध्यमातून नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दिवशी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत गोसंवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विनामूल्य नाडी परीक्षण, पंचगव्य चिकित्सा, तसेच गोआधारित उत्पादनांचे प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता सामूहिक गोपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेसाठी भारत संगम, सौ. शकुंतला आणि तुकाराम बेनकेगुरुजी सोशल ट्रस्ट, विश्व हिंदु परिषद, महाएन्जीओ फेडरेशन, बन्सी गोशाला अहमदाबाद, श्री हरी सत्संग समिती मुंबई, विज्ञान संस्था देवालापार नागपूर, सिद्धगिरी मठ कन्हेरी कोल्हापूर, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, ओम् सदगुरु वडवाळ सिद्ध नागनाथ वन औषधी संकलन आणि गोशाळा नाशिक, राजीव दीक्षित आरोग्य मंदिर, गोसेवा एक जनआंदोलन, इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती, तसेच इतर अनेक संस्थांच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, वैद्य हितेश जानी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. बंडातात्या कराडकर, राजीव जैन आदी मान्यवरांची असून त्यांचे ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. विनामूल्य नाडी परीक्षण अथवा परिषदमध्ये सहभागी होण्यासाठी ९४२३८९३१९७ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.