हिंदु जनजागृती समिती देशभर आंदोलन करणार ! – सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘संभाजी भिडेंना रोखा, नाहीतर महाराष्ट्रात कठुआ आणि उन्नाव यांप्रमाणे घटना घडतील !’

पश्‍चिम महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ (जम्मू) आणि उन्नाव (उत्तरप्रदेश) यांप्रमाणे महाराष्ट्रातही असे (बलात्काराचे) प्रकार घडायला नको असतील

काळाचौकी (मुंबई) येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याची विकासकाकडून धमकी !

‘श्रेणिक सिरोया बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या विकासकाकडून (बिल्डरकडून) झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली काळाचौकी येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विकासकाकडून गुंड पाठवून विश्‍वस्तांना धमक्या दिल्या जात आहेत.

पूू. भिडेगुरुजी यांना मानणार्‍या समस्त हिंदु बांधवांनी मोर्च्यात सहभागी व्हावे ! – भरत माळी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

कोरेगाव भीमा प्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांना अटक करण्यासाठी मोर्चे निघत आहेत. हा सत्य दडपण्याचा प्रयत्न आहे. पू. संभाजी भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे निर्दोष असून त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. या मागणीसाठी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येत आहे.

पू. भिडेगुरुजी, मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या !

दलित बांधव हिंदु समाजाचा घटक असतांना त्यांचा जातीय राजकारणासाठी वापर करत ‘हिंदु विरुद्ध दलित’ असे चित्र रंगवणारे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांना अटक करावी, तसेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री. मिलिंद एकबोटे आणि हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.

सरकार घोटाळेबाजांना पाठीशी का घालत आहे, याचे सहकारमंत्र्यांनी उत्तर द्यावे !

नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने लाभार्थी शेतकर्‍यांची खोटी सूची सादर करून डिसेंबर २००९ मध्ये ८ कोटी ८६ लाख रुपयांची कर्जमाफी पदरात पाडून घेतली

श्री सिद्धीविनायक मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शासन करा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे समस्त गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात. वर्ष २०१६ मध्ये श्री सिद्धीविनायक गणपति मंदिराच्या न्यासाच्या केलेल्या तपासणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

दंगलीला कारणीभूत असलेले प्रकाश आंबेडकर यांना तात्काळ अटक करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

माझ्यावर होणारे आरोप म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी देणे’, असा प्रकार आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष दलितांच्या मतांचा वापर करून घेत आहेत; मात्र यातून प्रश्‍न अधिकच चिघळत आहे. प्रकाश आंबेडकर हे विद्वेषाचे राजकारण करत असून ते माझी अपकीर्ती करण्याचे ते षड्यंत्र आहे. – पू. भिडेगुरुजी

पशूवधगृहाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कर्नाटक सरकार अपयशी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकार पशूवधगृहांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्यात कर्नाटक सरकार अयशस्वी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकारने ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम’ हा कायदा लागू करून हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेतल्या; परंतु सरकार या भूमीचे रक्षण करण्यात संपूर्णत: अयशस्वी ठरले आहे


Multi Language |Offline reading | PDF