सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. राजन बुणगे, बोलतांना मध्यभागी श्री. रमेश शिंदे आणि श्री. वेणूगोपाल जिला

सोलापूर, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच्.आय. व्ही. सारख्या रोगांशी तुलना करून त्याला संपावण्याची भाषा केली जात आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवून सनातन धर्मियांमध्ये जागृती केली जाणार आहे, तसेच ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंद करणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. वेणूगोपाल जिला, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे आदी उपस्थित होते.

श्री. शिंदे पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर सरकारने स्वतः गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले असतांनाही १०० कोटी समाज असणार्‍या सनातन धर्माच्या विरुद्ध बोलणार्‍यांवर गुन्हे नोंद झालेले नाहीत.

या वेळी श्री. वेणूगोपाल जिल्हा म्हणाले, ‘सनातन धर्मरक्षक’ अभियानात सोलापूर येथील सर्व धर्मप्रेमींनी सहभागी व्हावे.’’