नाणार येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्प जनतेची लूट आणि कोकण उद्ध्वस्त करणारा असेल ! – प्रा. महेंद्र नाटेकर, अध्यक्ष, स्वतंत्र कोकण संघटना

‘रिफायनरी’मुळे होणार्‍या वायूप्रदूषणामुळे सजीव सृष्टीवर घातक परिणाम होतात

‘नमामि चंद्रभागा’ योजना प्रत्‍यक्षात कधी ?

सरकारने इच्‍छाशक्‍ती दाखवून खर्‍या अर्थाने चंद्रभागेचे पावित्र्य टिकवण्‍यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा, असे वारकरी आणि भाविक यांना वाटते !

ग्लोबल मेअर्सच्या अंतिम फेरीत पुण्याचा समावेश !

इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेत सादर केली होती.

शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णानदीत, प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने शहर आणि परिसरातील सर्व नाले, गटारी या भरून वहात आहेत. हे सर्व पाणी कृष्णा नदीजवळ असलेल्या शेरीनाल्यात मिसळते.

वायूप्रदूषणाचा घातक विळखा !

वायूप्रदूषण सहसा हिवाळ्यात अधिक होते; मात्र गेल्या ३ वर्षांत उन्हाळ्यातही वायूप्रदूषणात वाढ झाली आहे, असे तज्ञांनी म्हटले आहे. हवेतील सूक्ष्म आणि अतीसूक्ष्म धूलिकणांत लक्षणीय वाढ झाल्याचीही माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

उन्हाळ्यात सर्वाधिक वायूप्रदूषण असणार्‍या राज्यांतील १० ठिकाणांमध्ये पुण्यातील ३ ठिकाणांचा समावेश !

नैसर्गिक जंगले जाऊन इमारतींची जंगले वाढल्यामुळे वायूप्रदूषण वाढले आहे. सरकारने आतातरी ज्या ज्या कारणांमुळे वायूप्रदूषण वाढत आहे, त्यावर लवकरात लवकर उपाययोजना काढावी ही अपेक्षा !

वाराणसी येथे गंगा नदीचे पाणी हिरव्या रंगाचे झाल्याने चौकशीचा आदेश

प्रदूषणामुळेच अशा प्रकारचा पालट झाला आहे, हे वेगळे सांगायला नको ! प्रदूषणामुळे पंचमहाभूतांमध्ये होत असलेले अनिष्ट पालट रोखण्यासाठी पंचमहाभूतांनीच जर रौद्र रूप दाखवणे चालू केले, तर जगात काय स्थिती निर्माण होईल, याची कल्पना करता येत नाही !

तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

वाढणार्‍या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.

पंचगंगा नदीकाठी असणार्‍या उंचगाव, गांधीनगर येथील ओढे-नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ कराव्यात ! – राजू यादव, करवीर शिवसेना

गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील सर्व गटारी प्लास्टिक आणि इतर कचरा यांनी तुडुंब भरल्या आहेत. पावसाळ्यात ही गटारे तुंबून दुकानांमध्ये पाणी जाऊन प्रचंड हानी होते.

विनामूल्य भरपूर ऑक्सिजन आणि पर्यावरण संरक्षण यांसाठी भारतीय झाडे लावा !

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर पिंपळ, नीम आणि वडाचे झाड लावले, तर प्रदूषणमुक्त भारत होईल. ज्यांच्या बाजूला जागा असेल, त्यांनी तुळस लावावी. आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या भारताला नैसर्गिक आपत्तीतून वाचवूया.