भाजपच्या आमदारांकडून मागणीला विरोध
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर विधानसभेच्या पहिल्याच दिवशी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे (पीडीपीचे) आमदार वहीद पारा यांनी कलम ३७० हटवण्यात आल्याच्या विरोधात ठराव मांडला. यासह त्यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा बहाल करण्याचीही मागणी केली. या प्रस्तावांना भाजपच्या आमदारांनी विरोध केला. भाजपचे आमदार शामलाल शर्मा यांनी ‘वहीद पारा यांनी असा प्रस्ताव आणून सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना निलंबित करावे’, आी मागणी केली. सध्या जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे.
१. भाजपचे आमदार प्रस्तावाला विरोध करत असतांनाच सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदारही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेमध्ये आले. ते म्हणाले की, भाजपचे लोक कामकाजात अडथळा आणत आहेत.
२. गदारोळाच्या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अब्दुल रहीम राठर हे ‘सर्व आमदारांनी आपापल्या जागेवर बसावे’, असे वारंवार आवाहन करत होते; मात्र त्यांचे कुणीही ऐकले नाही. ‘हा प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही. तो वाचूनच निर्णय घेतला जाईल’, असे अब्दुल रहीम राठर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाकलम ३७० पुन्हा लागू करता येणार नाही, हे ठाऊक असतांनाही जाणीवपूर्वक विधानसभेत गदारोळ करून वेळ वाया घालवणार्यांकडून याचा खर्च वसूल केला पाहिजे ! |