Iltija Mufti Insults Hindutva : (म्हणे) ‘हिंदुत्व हा एक आजार असून प्रभु रामाला लाज वाटली पाहिजे !’

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा यांची ‘एक्स’वर पोस्ट !

मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांनी एक्स वर पोस्ट करत ‘हिंदुत्व हा एक आजार आहे, ज्याने कोट्यवधी भारतियांना ग्रासले आहे आणि देवाचे नाव कलंकित केले आहे’ असे म्हटले आहे. इल्तिजा यांनी एक व्हिडिओ शेअर करत ‘प्रभु राम यांना लाज वाटली पाहिजे’, असेही म्हटले आहे.

इल्तिजा यांनी शेअर केलेला व्हिडिओ शिरीन खान नावाच्या एक्स वापरकर्त्याने शेअर केला होता. यात लिहिले होते की, मुसलमान अल्पवयीन मुलांवर क्रूर आक्रमण करण्यात आले आणि त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडले गेले. या गुन्हेगारांवर कारवाई का झाली नाही ?’ हा व्हिडिओ खरा कि खोटा हे अद्याप स्षष्ट झालेले नाही.

संपादकीय भूमिका

  • इस्लामविषयी कुणी अशा प्रकारचे विधान केले असते, तर संपूर्ण जगात हलकल्लोळ झाला असता आणि ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देण्यात आल्या असत्या; मात्र हे विधान मुसलमान तरुणीने हिंदूंच्या संदर्भात केल्याने कुणीच याची नोंद घेतलेली नाही, हे लक्षात घ्या !
  • आतापर्यंत इल्तिजा यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक झाली पाहिजे होती; मात्र तसे काहीच झालेले नाही, यातून हिंदु त्यांच्या धर्माच्या रक्षणासाठी किती निष्क्रीय आणि निद्रिस्त आहेत, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते !