पाकिस्तानच्या स्वातमध्ये उत्खननात सापडले १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर !

पाकमधील स्वात जिल्ह्यातील बारिकोट घुंडई भागात चालू असलेल्या उत्खननात १ सहस्र ३०० वर्षे जुने मंदिर आढळून आले आहे. येथील डोंगराळ भागात पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी हे मंदिर शोधले आहे.

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानच्या आक्रमणात कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक संग्राम पाटील हुतात्मा !

शस्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या आक्रमणात राजौरी येथे करवीर तालुक्यातील निगवे-खालसा येथील हवालदार संग्राम पाटील (३७ वर्षे) हे २१ नोव्हेंबर या दिवशी हुतात्मा झाले आहेत. ते गेली १७ वर्षे मराठा बटालीयनमध्ये सेवा बजावत होते.

पाकिस्तानला मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी मिळतच रहाणार ! – केंद्रीय राज्यमंत्री व्हि.के. सिंह

पाकिस्तान वर्ष १९९० पासून भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद्यांना एकत्र करत आहे. हे काम तो चालूच ठेवणार आहे. थोड्याशा पैशांसाठी सिद्ध होणारे मूर्ख आणि अशिक्षित आतंकवादी पाकला मिळतच रहाणार.

काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !

खिळखिळा पाकिस्तान आणि त्याचे चीनला साहाय्य !

भारतीय सैन्याने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यामुळे ९५ टक्के आतंकवादी सीमेवरच मारले जात आहेत. चीन भारताशी लढू शकत नाही; म्हणून पाकिस्तानचे साहाय्य घेतो हे चीनला न्यूनपणा आणणारे आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये टोल नाक्यावरील चकमकीत ४ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !

आतंकवादी हाफिज सईद याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफिज सईदला शिक्षा भोगावी लागण्याची शक्यता अल्पच आहे ! त्याला भारताच्याच हवाली केले पाहिजे !

मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव पालटा !

कराची स्वीट्स या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानातील आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो.

राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.

संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

संयुक्त अरब अमिरातने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि इतर ११ देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे.