पाकच्या सर्वोच्च न्यायालयाकडून संसद विसर्जित करण्याचा निर्णय रहित !

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकची संसद विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय रहित केला आहे. तसेच संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पुन्हा अविश्‍वादर्शक ठराव आणण्याचा आदेश दिला आहे.

‘जागतिक’ महासत्तेच्या दिशेने भारत !

जागतिक अस्थिरता माजलेली असतांना भारताचे रूप मात्र सोन्यासारखे उजळून निघत आहे. एकूण स्थिती अन् रशियासमवेत अमेरिका, इराण आदी देशांशी असलेले ‘स्वतंत्र’ चांगले संबंध भारताला आगामी जागतिक महासत्तेकडे घेऊन जायला पुरेसे आहेत, असे केवळ विचार नव्हे, तर प्रत्यक्ष जागतिक घडामोडी जोरकसपणे सांगत आहेत !

जिहादी आतंकवाद दाखवल्यावरून दक्षिण भारतीय अभिनेते विजय यांच्या चित्रपटावर कुवेतमध्ये बंदी

जिहादी आतंकवाद्यांचे खरे स्वरूप जगासमोर आल्यावर इस्लामी देशांना पोटशूळ का उठतो ? वस्तूस्थिती दाखवणार्‍या अशा चित्रपटांवर अरब देशांनी कितीही बंदी घातली, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक झालेले आहे !

पाकिस्तानी लोकशाही !

पाकचा जन्म झाल्यापासून गेल्या ७५ वर्षांत एकाही सरकारने त्याचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागे विविध कारणे असली, तरी मुख्य कारण हे पाकचे सैन्य आहे. त्यातही लोकांनी सरकार निवडून दिले, तरी सैन्याचे धोरण आणि आदेश यांनुसारच ते काम करत असल्याचे पाकच्या जनतेलाही ठाऊक असते.

अशांत पाकिस्तान आणि भारताला विविध अंगांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता !

भारताला प्रथम काश्मीर खोरे, दुसरे पंजाबसारखे सीमावर्ती राज्य आणि तिसरे समुद्राचा भाग या ठिकाणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व जमिनी आणि समुद्री सीमा यांकडे लक्ष ठेवावे लागेल !

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !

भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?

नवाज शरीफ यांच्या लंडनमधील कार्यालयावर आक्रमण

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लंडन येथील कार्यालयावर पुन्हा आक्रमण झाले आहे. २ दिवसांपूर्वीही त्यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्यावर आक्रमण झाले होते. आता १५ ते २० लोकांनी हे आक्रमण केल्याचे वृत्त आहे.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्‍वासदर्शक ठराव फेटाळला  

संसदेत अविश्‍वादर्शक ठरावाच्या विरोधात मतदान न घेणे, हे राज्यघटनेचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांचे नेते शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये आक्रमण

इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात आल्याचा आरोप