पुन्हा अविश्वासदर्शक प्रस्ताव आणण्याचा आदेश
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकची संसद विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय रहित केला आहे. तसेच संसदेत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पुन्हा अविश्वादर्शक ठराव आणण्याचा आदेश दिला आहे. येत्या ९ एप्रिल या दिवशी हा ठराव सादर करण्यासही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार या दिवशी कोसळण्याची शक्यता आहे. असे झाले, तर राष्ट्रपती विरोधी पक्षांना सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करू शकतात.