‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असतांना तो पाकमध्ये दाखवला !

भारताचा अविभाज्य भाग असलेला पाकव्याप्त काश्मीर पाकमध्ये दाखवून भारतियांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या अशा प्रसारमाध्यमांवर सरकार काय कारवाई करणार ?

मुंबई- इंग्रजी दैनिक ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने ४ एप्रिल २०२२ या दिवशी  पाकिस्तानमधील वाढत्या संकटाविषयी एक लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखाची ‘लिंक’  टाइम्स ऑफ इंडियाच्या ट्विटर खात्यावर देण्यात आली आहे. या वेळी पाकचा नकाशा (मानचित्र) दाखवण्यात आले आहे. त्यात जम्मू-काश्मीरच्या मोठा भाग आणि लडाख (गिलगिट-बलटिस्तान) पाकिस्तानच्या नकाशात दाखवण्यात आले आहे.

गिलगिट-बलटिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या नकाशामुळे ट्विटरवर राष्ट्रप्रेमींनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पाकिस्तानला दान केला आहे का ?’, असा प्रश्‍न काहींनी उपस्थित करत ‘टाइम्स ऑफ इंडिया’वर टीका केली आहे.