‘एन्.आय.ए.’कडून पुणे येथे पुन्हा धाडी

आतंकवाद्यांनी पुण्यात वापरलेली वाहने जप्त !

पुणे – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (‘एन्.आय.ए.’ने) आणि आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) पथकांनी २० एप्रिलला सकाळपासूनच कोंढवा परिसरात पुन्हा एकदा धाडी घातल्या. पुण्यासह देशभरातून अटक केलेल्या आतंकवाद्यांकडून ‘इसिस’चे मोड्यूल उघडकीस आले होते. या आतंकवाद्यांकडे केलेल्या चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पुण्यात पुन्हा एकदा धाडी घातल्या होत्या. पुण्यात पकडलेल्या आतंकवाद्यांचे काही काळ पुण्यात वास्तव्य होते. पुण्यात रहात असतांना त्यांनी वापरलेली वाहने यंत्रणांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती एन्.आय.ए.ने दिली.

एन्.आय.ए. आणि महाराष्ट्र ए.टी.एस्.च्या अन्वेषणात इसिसचे महाराष्ट्र मोड्युल आणि ‘अह-उल-सुफा’ यांतील समान आरोपी निष्पन्न झाले होते. त्यामुळे हे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले होते.