बेंगळुरू बाँबस्फोटाचे धागेदोरे छत्रपती संभाजीनगरपर्यंत !

छत्रपती संभाजीनगर – काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) या तिघांची ८ घंटे चौकशी करण्यात आली आहे. बेंगळुरू बाँबस्फोट प्रकरणातील फरार संशयित आतंकवादी अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब यांच्यासमवेत आभासी चलनाद्वारे (‘क्रिप्टोकरन्सी’द्वारे) व्यवहार केल्याचा ठपका या तिघांवर ठेवण्यात आला आहे. ज्यांची चौकशी करण्यात आली, त्या तिघांनीही शिक्षण अर्धवट सोडले आहे. तरीही ते लाखो रुपयांची कमाई करत असल्याने २ वर्षांपासून त्यांच्यावर अन्वेषण यंत्रणा पाळत ठेवून आहेत.
बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली. त्यात त्यांच्या घराची झाडाझडती घेऊन ‘लॅपटॉप’, भ्रमणभाष यांसह ते वापरत असलेले अन्य ‘इलेक्ट्रॉनिक साहित्य’ जप्त करण्यात आले आहे. त्यात संशयित आतंकवाद्यांना ओळखत नसल्याचे त्या तरुणांनी सांगितले.
| पसार आतंकवाद्यांवर १० लाख रुपयांचे बक्षीस !
अन्वेषण यंत्रणेने या प्रकरणी पसार असलेल्या २ संशयित आतंकवाद्यांची नावेही उघड केली आहेत. अब्दुल मतीन ताहा आणि मुसव्वीर हुसेन शाजीब अशी त्यांची नावे आहेत. त्यांची माहिती देणार्यांना १० लाख रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले आहे. ते ‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये व्यवहार करत असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. |
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !