साधकांना भावगंगेचे अमृतपान करणारे राष्ट्रीय भाववृद्धी आणि भक्ती सत्संग !

भावसत्संगांनी काय दिले नाही ? साधकांना देवाचे अस्तित्व अनुभवण्यापासून दूर नेणाऱ्या अहंचा लय करण्यासाठी प्रेरित केले !

भावाचे प्रकार आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुरूप भाव !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जी गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली जाते, तिच्यातही अध्यात्मातील ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या नियमानुसार साधना करतात.

शिष्यभाव

भावामुळे स्थूलदेहाची शुद्धी होण्यास आरंभ होतो. देहाची शुद्धी होणे म्हणजे सत्त्वगुण वाढणे. या प्रवासात जीव साधनेतील अनेक टप्पे शिकत असतो. व्यक्त भावामुळे प्राणदेह आणि प्राणमयकोष यांची शुद्धी होते, तर अव्यक्त भावामुळे प्राणमयकोष आणि मनोमय कोष यांची शुद्धी होते.

गोपीभाव !

‘गोपी’ श्रीकृष्णरूपी चैतन्याची एक तरल धारा आहे. ती श्रीकृष्णतत्त्वाची निखळ, निर्झर पारदर्शकता आहे. गोपीभाव म्हणजे श्रीकृष्णभेटीची तळमळ किंवा श्रीकृष्णभेटीतील आर्तता !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो….

भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना

१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.

भावामृत विशेषांकाच्या निमित्ताने प्रार्थना !

हे ब्रह्मांडनायक, नारायणस्वरूप गुरुमाऊली, आम्ही तुला संपूर्णपणे शरण आलो आहोत. आम्हा पामर जिवांना तुझ्या अथांग प्रीतीच्या छत्रछायेखाली आश्रय देऊन तू कृतकृत्य केले आहेस !

साधिकेला दाढदुखीमुळे वेदना होत असतांना आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवाने तिच्याकडून करवून घेतलेला एक छोटासा प्रयोग !

देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले.

‘भार्या म्हणे सुदाम्यासी’ हे भजन ऐकतांना साधकाने अनुभवलेली सुदाम्याची अवस्था!       

२९.५.२०१२ या दिवशी सकाळी ५ वाजता मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत होतो.