विविध दैनंदिन कृती करतांना ठेवलेला भाव !

१. तोंडाला पावडर लावतांना ठेवलेला भाव

‘तोंडाला पावडर लावतांना ती पावडर नसून व्रजभूमीतील (वृंदावनातील) श्रीकृष्ण, राधा आणि गोपी यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली माती आहे’, या भावाने पावडर लावली जाते अन् मनामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भाव जागृत होतो.

२. जेवणाची भांडी धुतांना ठेवलेला भाव

जेवणानंतर मी माझे ताट, वाट्या आणि पेले धुतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जेवण केलेली भांडी किंवा तिरुपती बालाजीला दाखवलेल्या नैवेद्याचे पात्र धूत आहे’, असे मला जाणवते आणि मन शांत होते.

३. भांडी धुण्यासाठी ठेवलेल्या प्रक्षालनपात्र(सिंक)विषयी ठेवलेला भाव

‘भांडी धुण्यासाठी पाण्याने भरून ठेवलेली ३ प्रक्षालनपात्रे (सिंक) म्हणजे, अनुक्रमे गोपीकुंड, राधाकुंड आणि श्यामकुंड असून, भांडी म्हणजे, माझे मन आहे. त्यामुळे तीन कुंडांमध्ये स्नान करून माझे मन शुद्ध आणि पवित्र होत आहे’, असे मला जाणवते अन् आनंद मिळतो.

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.