भावामृत विशेषांकाच्या निमित्ताने प्रार्थना !

हे ब्रह्मांडनायक, नारायणस्वरूप गुरुमाऊली, आम्ही तुला संपूर्णपणे शरण आलो आहोत. आम्हा पामर जिवांना तुझ्या अथांग प्रीतीच्या छत्रछायेखाली आश्रय देऊन तू कृतकृत्य केले आहेस ! अनेक अडथळे पार करत जाणारी आमची जीवननौका तुझ्या आणि केवळ तुझ्या अपार कृपेमुळेच पैलतिरी लागणार आहे. तुझ्या स्मरणाचे भावामृत अविरत प्राशन करता येऊ दे आणि आमचे जीवनरूपी भावपुष्प तुझ्या चरणी संपूर्णपणे अर्पण करता येऊ दे, हीच या विशेषांकाच्या निमित्ताने प्रार्थना !