‘आपत्काळात वेदनांना तोंड कसे द्यायचे ?’, हे शिकवणारी एक आदर्श साधिका !

‘२०.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री ३ वाजता माझ्या उजव्या दाढेत जोरात कळ येऊन मला जाग आली. तेव्हा माझ्या मनात वेदनाशामक गोळी घेण्याचा विचार आला; पण देवाने मला गोळी न घेता वेदना सहन करण्यास सांगितले. त्यामुळे मी वेदनांकडे दुर्लक्ष करत नामजप आणि भावप्रयोग करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे मध्यम स्वरूपातील वेदनेचे रूपांतर मंद वेदनेत झाले, तरीही त्या वेदना मला सहन होत नव्हत्या. अशा स्थितीत जवळजवळ १०-१५ मिनिटे गेल्यावर मी देवाला ‘आता मला वेदना सहन होत नाहीत’, असे सांगितले. तेव्हा देवाने मला मानस रूपात वेदनाशामक गोळी घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी वेदनाशामक गोळी घेण्याची मानस कृती केल्यावर ५ मिनिटांतच मला जणू खरंच वेदनाशामक गोळी घेतल्याप्रमाणे वेदना न्यून होऊन गाढ झोप लागली. त्यानंतर नेहमीप्रमाणे मी सकाळी ७ वाजताच जागी झाले. तेव्हाही मला मंद स्वरूपाच्या वेदना होतच होत्या; पण देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले. तेव्हा मला ‘आपत्काळात वेदना होत असतांना औषधे न मिळाल्यास माझी साधना कशी होणार ?’, याची काळजी वाटली. त्यामुळे आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच मला मध्यरात्री ३ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, म्हणजे एकूण १३ घंटे वेदना सहन करण्याची शक्ती दिली. माझ्या आयुष्यात प्रथमच मी एवढे घंटे वेदना सहन केल्या असतील. मंद स्वरूपातील वेदना पूर्णपणे थांबण्यासाठी दुपारी ४ वाजता मात्र मी स्थुलातून वेदनाशामक गोळी घेतली.
या वेदनांमुळे मला होणारा आध्यात्मिक त्रासही वाढला. अशा स्थितीत वेदना सहन करणे, म्हणजे एक अग्निदिव्यच होते; पण ‘आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून देवानेच माझ्याकडून हा प्रयोग करवून घेऊन मला वेदना सहन करण्याची शक्ती दिली’, असे मला वाटले. या प्रसंगातून मला आपत्काळाची थोडीशी कल्पना आली; पण हा प्रयोग केवळ त्याच दिवशी केला. ’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, गोवा. (२०.१.२०२२)
आपत्काळात साधन-सामग्रीचा अभाव असतांना प्रसंगाला कशा प्रकारे तोंड द्यायचे, यासाठी साधिकेने केलेला हा व्यक्तीगत प्रयत्न आहे. – संपादक
|
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
वैराग्यस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !