Sri Lankan Navy Firing Indian Fisherman : श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मासेमारांवर गोळीबार : ५ जण घायाळ

भारताकडून निषेध  !

नवी देहली – श्रीलंकेच्या नौदलाकडून २८ जानेवारीला सकाळी तमिळनाडू येथील डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय मासेमारांना कह्यात घेत असतांना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात २ मासेमार गंभीररित्या, तर अन्य ३ किरकोळ घायाळ झाले. त्यांच्यावर श्रीलंकेतील रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेवरून श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला येथील परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तान, श्रीलंका आदी शेजारी देशांकडून भारतीय मासेमारांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी भारताने ठोस उपाययोजना करावी !
  • सध्या भारताच्या साहाय्यामुळे जगणार्‍या श्रीलंकेला असे करण्याचे धाडस कुठून येते ? भारत ज्यांना साहाय्य करतो ते भारतावर का उलटतात ? भारत नेभळटाप्रमाणे वागतो आणि आत्मघातकी गांधीगिरी करतो का ?, असे प्रश्न उपस्थित होतात !