केंद्रशासन देहली वक्फ बोर्डाच्या १२३ मालमत्ता नियंत्रणात घेणार !

मागील काँग्रेस सरकारने बोर्डाला दिल्या होत्या !

बंगालच्या जादवपूर विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्याचा दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून मृत्यू

विश्‍वविद्यालयात विद्यार्थी शिकण्यास येतो. तेथे त्याच्यावर नैतिकतेच्या शिक्षणाने योग्य संस्कार करून तो आदर्श नागरिक बनेल, हे पहाणे आवश्यक असते; मात्र अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे. यातून विश्‍वविद्यालयांची स्थिती उघड होते !

आज सायंकाळी ६.०४ वाजता ‘लँडर विक्रम’ चंद्रावर उतरणार !

नियंत्रण कक्षातून आदेश मिळाल्यानंतर रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर धावेल. या काळात त्याची चाके चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडतील.

व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याच्या आदेशाविरुद्ध गोवा सरकारच्या वतीने अधिवक्ता मुकुल रोहतगी लढणार

विशेष म्हणजे गोवा सरकारने म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर गोवा खंडपिठाचा आदेश आला आहे. या आदेशानंतर वनमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा खंडपिठाच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे त्वरित घोषित केले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे २२ ऑगस्ट या दिवशी दुपारी गोवा दौर्‍यासाठी दाबोळी विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल पी.एस्. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

वैदिक विज्ञान आणि मंत्रशास्‍त्राचे अभ्‍यासक डॉ. फडके यांचा मंत्रशास्‍त्रातील संशोधनाविषयी सन्‍मान !

या वेळी डॉ. फडके म्‍हणाले की, ज्‍योतिष हे शास्‍त्र असून त्‍यातील बारकावे समजून घेतले पाहिजेत. अथर्व वेदातील कर्मजभाव व्‍याधी दैवी चिकित्‍सा आणि ज्‍योतिष शास्‍त्राचा अभ्‍यास करून त्‍यायोगे मोठे व्‍याधी निवारण करता येते.

सनातनच्‍या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे दिवंगत पती आणि स्‍वातंत्र्ययोद्धे बि. दामोदर प्रभु यांचा करण्‍यात आला सन्‍मान !

केंद्रशासनाच्‍या ‘माझी माती, माझा देश’ या देशव्‍यापी अभियानांतर्गत मंगळुरू (कर्नाटक) येथे विरांचा सन्‍मान

डॉ. दाभोलकर हत्‍येचे अन्‍वेषण भरकटण्‍याला त्‍यांचे कुटुंबीयच उत्तरदायी ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्‍या प्रकरण : प्रचार आणि वास्‍तव’

भोपाळमधून ५ मुसलमानांना अटक

फसवणुकीच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले मुसलमान !