सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’

सनातन संस्थेचा षड्यंत्रात नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू ! – चेतन राजहंसजिहादी आतंकवादाचे चित्र सर्वत्र दिसत असतांना कुठे तरी अल्पसंख्यांकांची मतपेटी वाचावी, यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने वर्ष २००६ नंतर ‘भगव्या आतंकवादा’चे चित्र निर्माण केले. प्रथम मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये हिंदूंना गोवण्यात आले. ‘गांधी हत्येनंतर या देशात केवळ दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्याच हत्या झाल्या अन् त्या हिंदुत्वनिष्ठांनीच केल्या’, असा अपप्रचार अजूनही चालू आहे. ‘हा अपप्रचार आणि चर्चा चालू ठेवत जिहादी अन् साम्यवादी यांनी देशभर केलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांविषयी पांघरूण घालायचे’, असे एक षड्यंत्र देशात चालू आहे. त्यात सनातन संस्थेचा नाहक बळी देण्याचा प्रयत्न चालू आहे. ‘ऑनलाईन’ विशेष संवाद पहाण्यासाठी पुढील लिंक पहा : https://shorturl.at/bmrGQ |

मुंबई – डॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण प्रारंभीपासूनच पूर्वग्रहदूषितपणाने एकांगी आणि राजकीय विचारांनी केले गेले. अध्यात्मप्रसार आणि सामाजिक कार्य करणार्या सनातन संस्थेला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात दोषी ठरवण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला गेला. ‘दाभोलकरांचा खून सनातनच्या साधकांनी केला आहे’, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितल्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने अन्वेषण केले. या प्रकरणात पोलिसांनी सनातनच्या ७०० हून अधिक साधकांची चौकशी केली; मात्र काहीही निष्पन्न झाले नाही. अन्वेषणाला प्रारंभ होण्यापूर्वीच ‘आरोपी कोण ?’, हे प्रथम निश्चित करण्यात आले आणि तसे अन्वेषण करून खोटे पुरावे गोळा करण्यात आले. त्यात पुढे २ वेळा आरोपी आणि साक्षीदार पालटण्यात आले. त्यामुळे दाभोलकर हत्येचे अन्वेषण हे पूर्णपणे भरकटलेले असून त्याला कुटुंबीय आणि तत्कालीन नेतेच उत्तरदायी आहेत, असे उद़्गार सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी काढले. संस्थेच्या वतीने ‘डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : प्रचार आणि वास्तव’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
श्री. चेतन राजहंस यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
१. लोकांना डॉ. दाभोलकर यांचा ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट’ माहिती आहे; पण त्यांचा ‘परिवर्तन’ नावाचाही ट्रस्ट आहे, ज्यात त्यांच्या परिवारातील बहुतांश सदस्य ट्रस्टवर आहेत. हा खर्या अर्थाने त्यांचा ‘परिवार’ ट्रस्ट आहे, ही माहिती समाजात उघड झालेली नाही.
२. काश्मीरला भारताचा भाग न दाखवणार्या ‘स्वीस एड फाऊंडेशन’ या विदेशी संघटनेकडून या ‘परिवर्तन ट्रस्ट’ला सेंद्रिय शेतीच्या नावाखाली कोट्यवधीच्या देणग्या येत होत्या. सेंद्रिय शेती आणि दाभोलकर यांचा काडीमात्रही संबंध नव्हता. तसेच ‘वृत्तपत्र चालवणार्या संस्थेला विदेशांतून देणग्या घेता येत नाहीत’, असा कायदा असूनही ते विदेशी देणग्या घेत होते.
३. या संदर्भात तक्रारी केल्यावर डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टचा ‘विदेशी योगदान नियमन कायद्या’विषयीचा (‘एफ्.सी.आर्.ए.’चा) परवाना सरकारने रहित केला. तसेच आधीच्या अंनिस ट्रस्टमध्येही अनेक खोटे व्यवहार झाले होते. त्यामुळे ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची शिफारस धर्मादाय कार्यालयाने केली होती.
४. या सर्व प्रकारामुळे अंनिस ट्रस्टवर असणार्या अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची अपकीर्ती झाली होती.
५. जर डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली नसती, तर आज ते कारागृहात असते; कारण त्यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे भक्कम पुरावे आमच्याकडे होते; मात्र त्या वेळी दुर्दैवाने त्यांची हत्या झाली.
६. या आर्थिक घोटाळ्यांतून वा त्यांच्या संघटनेचे नक्षलवाद्यांशी असलेल्या संबंधातूनही त्यांची हत्या झालेली असू शकते, या दिशेने अन्वेषण का करण्यात आले नाही ?
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद