संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनाची मैत्री दिव्याच्या ज्वालेसमान असणे !
दुर्जनदूषितमनसां पुंसां सुजनेऽपि नास्ति विश्वासः।
दुग्धेन दग्धवदनस्तक्रं फूत्कृत्य पामरः पिबति॥
अर्थ : दुर्जनाच्या अनुभवाने माणसाचे मन दूषित झाले की, त्याचा सज्जनावरचा विश्वाससुद्धा उडतो. दुधाने तोंड पोळले की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.