जळगाव – जळगाव एम्.आय.डी.सी.चा ‘डी’ दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनासाठी २३ कोटी रुपये, तर ट्रक टर्मिनससाठी १३ कोटी रुपये संमत केले आहेत, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व मागण्या केल्याचेही उद्योगमंत्र्यांनी या वेळी सांगितले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.