|
सांगली, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – सामाजिक माध्यमांवर छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन पलूस तालुक्यातील एका हिंदु तरुणीवर इजाज अमिन मुजावर याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इजाज मुजावर याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
इजाज मुजावर हा मजुरीचे काम करतो. पलूस तालुक्यातील एका तरुणीशी त्याने ओळख निर्माण केली होती. सप्टेंबर २०२३ पासून तो तिला छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मारहाण करत होता. त्याने अंकली पुलाजवळील आयुष लॉज, सांगली येथील लक्ष्मी विष्णु अपार्टमेंट, सांगली बस स्थानकजवळील लॉज, झेंडा चौक कर्नाळ रस्ता येथील स्वत:च्या घरी बळजोरीने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. (अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
अखेर इजाज याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.