गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील घटना

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – एका हिंदु युवकावर प्रेम करणार्या शीबा या मुसलमान युवतीची तिच्याच सख्ख्या आणि चुलत भावांनी हत्या केली. भावांनी येथील मुरादनगरच्या गंगनहर नावाच्या कालव्यापाशी तिला नेले आणि तिचा गळा दाबून ठार मारले. त्यानंतर तिच्या मृतदेहाला कालव्यात फेकून दिले. सख्खा भाऊ सूफियान आणि चुलत भाऊ महताब यांना शीबा तिच्या हिंदु प्रियकराशी बोलत असल्याचे आवडत नसे. त्यामुळे त्यांनी ही हत्या केल्याचे पोलिसांसमोर स्वीकारले आहे.
मूळची उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यातील १७-१८ वर्षांची शीबा एक स्थानिक हिंदु मुलाच्या प्रेमात पडली. या तिचे भाऊ २१ वर्षीय सूफियान आणि २४ वर्षीय महताब यांचा विरोध होता. यामुळे दोघांनी काहीतरी कारण सांगून तिला देहलीतील तिच्या नातेवाइकांकडे नेले. तेथेही ती हिंदु प्रियकराशी भ्रमणभाषवरून बोलत असे. हे कळाल्यावर त्याचा राग धरून दोघांनी तिची हत्या केली. दोघे कालव्याच्या ठिकाणापासून परतत असतांना पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी लगेच त्यांच्या गुन्ह्याची स्वीकृती दिली. पोलीस उपायुक्त (ग्रामीण) विवेक चंद्र यादव यांनी या गुन्ह्यासंदर्भात माहिती दिली. कालव्यात फेकलेला शीनाचा मृतदेह शोधण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल, तसेच पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati