
पुणे – कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३ ऑक्टोबरला रात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. (गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणार्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून पोलिसांची निष्क्रीयताच अधोरेखित होते ! – संपादक)

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की, पीडित मुलगी तिच्या मित्रासमवेत बोपदेव घाटात गेली होती. रात्री ११ वाजता त्या ठिकाणी ३ अनोळखी मुले आली. त्यांनी पीडितेसमवत असलेल्या मुलाला मारहाण केली. तरुणीवर अत्याचार केले. या घटनेची माहिती पोलिसांना ४ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता मिळाली. यासाठी एकूण १० पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेतील ३ मुलांचा शोध चालू आहे. या घटनेतील पीडित तरुणी गंभीर घायाळ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिकाप्रचंड प्रमाणात वाढलेल्या युवतींवरील बलात्काराच्या घटना पहाता ‘७ च्या आत घरात’चे महत्त्व लक्षात येते ! |
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
१० वर्षे उलटूनही ‘सी.आय.डी.’ अहवाल गुलदस्त्यातच ?
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
समान नागरी कायदा अस्तित्वात येणे, ही काळाची आवश्यकता ! – मिलिंद एकबोटे, कार्याध्यक्ष, समस्त हिंदु आघाडी
छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेणे हे सर्वांचे भाग्य ! – तनीकेल्ला भरणी
‘युवान’ ही युवकांसाठी प्रेरणादायी चळवळ ! – प्रा. डॉ. रजनीश कामत, कुलगुरु