भोर (जिल्हा पुणे), ४ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदु देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी यावी आणि असे फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, तसेच एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. सकल हिंदु समाज, भोर यांच्या वतीने भोर येथील अपर तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, तसेच भोर पोलीस ठाण्यात देण्यात आले.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सोमनाथ ढवळे, सुनील खळदकर, गणेश बांदल, अमित शहा, वैभव आवाळे, यश पवार आदींसह हिंदु जनजागृती समितीचे श्रीकांत बोराटे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअसे निवेदन का द्यावे लागते ? पोलिसांना ते लक्षात का येत नाही ? |