जळगाव – रावेर आणि सावदा परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी चालू असते. ३ ऑक्टोबरला अवैध गोवंशियांची वाहतूक करणार्या वाहनचालकाने गोरक्षक आणि रावेर तालुका बजरंग दल संयोजक कुलदीप पवार यांना भरदिवसा गाडीने उडवले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते.
संपादकीय भूमिका :अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण ! |