(म्हणे) ‘ईश्‍वराची निर्मिती मासिक पाळीमुळे अशुद्ध ठरत नाही, याचे स्मरण चित्रपट करून देतात !’ – बंगाली अभिनेत्री ऋतांभरी चक्रवर्ती

व्यक्ती केवळ स्त्री किंवा पुरुष असल्याने श्रेष्ठ, कनिष्ठ किंवा सम पातळीवर येत नाही, तर स्वतःच्या कर्माने स्वतःचे स्थान निर्माण करते, हेही न कळणारे अशी वक्तव्ये करतात !

कर्नाटकमधील भाजप सरकार गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार !

कर्नाटकातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! ‘असा निर्णय प्रत्येक भाजप शासित राज्यांत घेतला गेला पाहिजे’, असेच हिंदूंना वाटते !

‘तांडव’ वेब सिरीजच्या दिग्दर्शकाच्या विरोधात अखेर मुंबईत गुन्हा नोंद

देवतांचे विडंबन करणार्‍या ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते, ओरिजिनल कन्टेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, गौरव सोलंकी, झिशान आणि अन्य कलाकार यांच्यावर अखेर गुन्हा नोंद !

हिंदु मंदिरांवरील आघात थांबले नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल ! – के. रविंदर रेड्डी, अध्यक्ष, आंध्रप्रदेश हिंदु देवालय परिरक्षण समिती, तेलंगाणा

आंध्रप्रदेशच्या ‘श्रीशैल पुण्यक्षेत्रावर अन्य धर्मियांचे स्वामीत्व’ या विषयावरील विशेष ‘ऑनलाईन’ संवादाला ११ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता ! –  मानससिंह राय, भारतीय साधक समाज, बंगाल

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिवस’ अर्थात् स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

चित्रपट निर्माता साजिद खानवर आणखी एक लैंगिक छळाचा आरोप

साजिदने माझ्याशी गैरकृत्य केले होते.

काँग्रेसच्या काळात म्हणजे १९८० च्या दशकापासून चीनचे भारतीय भूमीवर नियंत्रण !

काँग्रेसच्या काळात झालेल्या चुका भाजपच्या राज्यात सुधारणे आवश्यक आहेत, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

‘तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे का ?’- अभिनेत्री कंगना राणावत यांचा आव्हानात्मक प्रश्‍न

‘‘क्षमा मागण्यासाठी तो राहील तरी कसा ? ते थेट गळाच कापतात. जिहादी देश फतवे काढतात. तुम्हाला फक्त जिवे मारले जात नाही, तर ते करणे किती योग्य होते, हेही सिद्ध केले जाते. बोल अली अब्बास जफर तुझ्यात अल्लाहची मस्करी करण्याचे धैर्य आहे ?’

आमच्याही वर एखादे न्यायालय असते, तर ५० टक्के आदेश पालटले गेले असते ! – सर्वोच्च न्यायालय

‘जनतेच्या मनातील शंका दूर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निकाल देतांना असे जे म्हटले आहे, त्यावर न्यायव्यवस्थेने विचार करून ही त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत’, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !

केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करणार !

नेताजी बोस यांची जयंती केवळ ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी न करता प्रत्यक्षात पराक्रम करून दाखवणे, हीच त्यांना खरी मानवंदना ठरील !