हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभागी होणे, ही काळाची आवश्यकता ! –  मानससिंह राय, भारतीय साधक समाज, बंगाल

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

स्वामी विवेकानंद

धनबाद (झारखंड) – स्वामी विवेकानंद यांनी त्यांचे गुरु स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या आशीर्वादाने हिंदु धर्माचा प्रसार अखिल विश्‍वात केला. त्याचप्रमाणे सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या कार्यात आपल्याला यथाशक्ती सहभागी व्हायचे आहे आणि हीच काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बंगालच्या ‘भारतीय साधक समाज’ या संस्थेचे श्री. मानससिंह राय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय युवा दिवस’ अर्थात् स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने नुकतेच ‘ऑनलाईन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात श्रीकृष्ण सेनेचे विजय यादव, महावीर आखाडाचे अरविंद साहा, धर्माभिमानी कृशान पाल, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अमरजित प्रसाद, सुमंत देबनाथ  आणि सनातन संस्थेचे पूर्व अन् पूर्वोत्तर भारत समन्वयक शंभू गवारे आदी सहभागी झाले. या कार्यक्रमाचा लाभ झारखंड, बंगाल, आसाम आणि मेघालय या राज्यांतील अनेक धर्मप्रेमींनी घेतला.

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मान्यवरांचे विचार

श्री. विजय यादव – स्वामी विवेकानंद यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज युवकांनी धर्मकार्यात सहभागी व्हावे.

श्री. अरविंद साहा – नरेंद्र लहानपणापासून निर्भय होते. वर्ष १८७० मध्ये त्यांनी ईश्‍वरचंद्र विद्यासागर शाळेत शिकत असतांना इंग्रजी शिकण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी गोर्‍यांची भाषा अजिबात शिकणार नाही !’’

श्री. कृशान पाल – स्वामींविषयी बोलण्यासाठी माझे जीवन अपुरे पडेल, इतके महान कार्य त्यांनी केले आहे.

श्री. शंभू गवारे – ज्या प्रकारे स्वामीजींनी त्यांचे संपूर्ण जीवन हिंदु धर्माच्या सेवेसाठी समर्पित केले, त्याचप्रमाणे आज हिंदु राष्ट्र अर्थात् धर्मराज्याच्या स्थापनेसाठी आपणही समर्पित झाले पाहिजे.