हिंदु मंदिरांवरील आघात थांबले नाहीत, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल ! – के. रविंदर रेड्डी, अध्यक्ष, आंध्रप्रदेश हिंदु देवालय परिरक्षण समिती, तेलंगाणा

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशच्या ‘श्रीशैल पुण्यक्षेत्रावर अन्य धर्मियांचे स्वामीत्व’ या विषयावरील विशेष ‘ऑनलाईन’ संवादाला ११ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती

भाग्यनगर – अन्य धर्मीय षड्यंत्रपूर्वक हिंदु मंदिरांच्या धार्मिक दिनक्रमात हस्तक्षेप करत आहेत. हे ठाऊक असतांनाही मंदिराचे अधिकारी मौन धारण करून बसले आहेत. एका मासात या घटना थांबल्या नाहीत, तर हिंदुत्वनिष्ठ संघटना तीव्र आंदोलन करतील, अशी चेतावणी ‘आंध्रप्रदेश हिंदु देवालय परिरक्षण समिती, तेलंगाणा’चे अध्यक्ष के. रविंदर रेड्डी यांनी दिली. आंध्रप्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यातील अष्टदशा शक्तिपीठ आणि द्वादशा ज्योतिर्लिंग येथील श्रीशैल पुण्यक्षेत्रामध्ये अन्य धर्मियांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंदिराच्या परिसरातील दुकानांचा ठेकाही अन्य धर्मियांनाच दिला जातो. रजाक आणि रफी नावाचे धर्मांध मंदिराच्या धार्मिक दिनक्रमामध्ये हस्तक्षेप करत आहेत. मंदिराच्या गोशाळेतील गोमातांची स्थिती अतिशय दयनीय आहे. ही स्थिती थांबावी आणि मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘श्रीशैल पुण्यक्षेत्रावर अन्य धर्मियांचे स्वामीत्व’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ संवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री. रेड्डी यांनी संबोधित केले. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमातून ११ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींनी प्रत्यक्ष पाहिला.

धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवला, तर गुन्हे नोंद होतात ! – के. बासवराजू, प्रदेशाध्यक्ष, हिंदु देवालय परिरक्षण समिती, आंध्रप्रदेश

धर्मविरोधी घटनांच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला, तर तुमच्या विरोधात गुन्हे नोंद केले जातात. आज हिंदू जागृत झाले नाहीत, तर भविष्यात राजकीय नेते कायद्याचा दुरुपयोग करून हिंदु धर्मालाच नष्ट करतील.

राष्ट्रीय शिवाजी सेनेचे अध्यक्ष श्री. ताडोजु श्रीनिवास चारी म्हणाले, ‘‘मंदिरांवर होत असलेले आघात थांबवण्यासाठी सर्वप्रथम मंदिरांना सरकारच्या तावडीतून मुक्त केले पाहिजे.’’

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – चेतन गाडी, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे हिंदु मंदिरांची सतत तोडफोड केली जात असून मंदिरांवर अन्य धर्मियांचा प्रभाव वाढत आहे. देशात धर्मनिरपेक्ष सरकार असल्यामुळे मंदिरांवर हिंदूंचे नियंत्रण राहिले नाही. खरे तर धर्मनिरपेक्ष सरकारला मंदिरांवर नियंत्रण करण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यामुळे मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी हा देश हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. सरकारला जर हिंंदूंच्या मंदिरांचे नियंत्रण करायचे असेल, तर सरकारने हा देश आधी हिंदु राष्ट्र म्हणून घोषित केेला पाहिजे. श्रीशैलम् शुद्धीकरण अभियानाला प्रारंभ झाला असून सर्व हिंदु समाजाने संघटित होऊन त्यांचे योगदान देणे आवश्यक आहे.