Banner In New York Sky : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार थांबले पाहिजेत !

  • न्‍यूयॉर्कच्‍या आकाशात विमानाद्वारे फडकावण्‍यात आला फलक

  • बांगलादेशी कपड्यांवर बहिष्‍कार घालण्‍याची केली मागणी

न्‍यूयॉर्कच्‍या आकाशात फलक ‘बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबला पाहिजे’,

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – येथे सकाळी हडसन नदीचा परिसर आणि जगप्रसिद्ध स्‍टॅच्‍यू ऑफ लिबर्टीचा परिसर येथे ‘बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबला पाहिजे’, असे लिहिलेला फलक आकाशात विमानाद्वारे फडकावण्‍यात आल्‍याचे दिसून आले. हा फलक बांगलादेशी वंशांच्‍या हिंदूंकडून फडकावण्‍यात आला होता. बांगलादेशी हिंदूंच्‍या समस्‍यांविषयी लोकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याच्‍या उद्देशाने हा फलक फडकावण्‍यात आला, असे त्‍यांच्‍याकडून सांगण्‍यात आले.

सौजन्य:ANI

१. याविषयी पंकज मेहता म्‍हणाले की, आता वेळ आली आहे की, मानवाधिकार परिषदेने राजकारण बाजूला ठेवून वर्ष १९७१ मध्‍ये बांगलादेशात झालेल्‍या नरसंहाराला मान्‍यता दिली पाहिजे. दुसर्‍या महायुद्धानंतरचे हे दुसरे सर्वांत मोठे हत्‍याकांड आहे. अमेरिकेच्‍या ३ संघटनांनी या हत्‍याकांडाला आधीच मान्‍यता दिली आहे, ज्‍यामध्‍ये पाकिस्‍तानच्‍या सुरक्षादलांनी जिहाद्यांद्वारे अल्‍पसंख्‍यांक हिंदूंना लक्ष्य केले होते.

२. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार थांबेपर्यंत बांगलादेशी कपड्यांवर बहिष्‍कार घालण्‍याचे आवाहन बांगलादेशी वंशांच्‍या लोकांकडून अमेरिकी लोकांना करण्‍यात आले.  बांगलादेशाच्‍या एकूण निर्यातीपैकी ८५ टक्‍के कापड निर्यात अमेरिकेत होते.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील हिंदू अशा प्रकारची कृती करून काहीतरी करण्‍याचा प्रयत्न करतात, हे कौतुकास्‍पद आहे. भारतातील हिंदू काय करत आहेत ?