चित्रपट निर्माता साजिद खानवर आणखी एक लैंगिक छळाचा आरोप

साजिद खान व शर्लिन चोप्रा

मुंबई – निर्माता साजिद खान याने आपला लैंगिक छळ केला होता, असा आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने ट्वीटद्वारे केला आहे. शर्लिन चोप्राने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी मी एप्रिल २०१५ मध्ये साजिदची भेट घेतली. या भेटीदरम्यान साजिदने माझ्याशी गैरकृत्य केले होते.