भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले ! – जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

वॉशिंग्टन/नवी देहली – भारताने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. यावरून आपल्याला लक्षात येते की, आपणही या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्या, तर कोरोनावर मात करू शकतो. लशीचा प्रभाव वाढल्यानंतर आपण आणखीही चांगल्या परिणामांची आशा करू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेेचे डॉ. ट्रेडोस घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असले, तरी उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. हे प्रमाण आता १.४० टक्क्यांवर आले आहे. या संसर्गातून १ कोटी ४ लाख ९६ सहस्र लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.१६ टक्के आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात आणखी घट होऊन तो १.४३ टक्के झाला आहे.