विदेशांतील कारागृहांमध्ये ७ सहस्र १३९ भारतीय नागरिक अटकेत

विदेशांतील कारागृहांमध्ये भारतीय नागरिक अटकेत

नवी देहली – विदेशांतील कारागृहांमध्ये ७ सहस्र १३९ भारतीय नागरिक अटकेत आहेत. यांतील काही भारतीय नागरिकांवर खटले चालू आहेत, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

मुरलीधरन् म्हणाले की, सर्वाधिक १ सहस्र ५९९ भारतीय नागरिक सौदी अरेबियातील कारागृहांत अटकेत आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये ८९८, नेपाळमध्ये ८८६, कुवैतमध्ये ५३६, मलेशियामध्ये ५४८ भारतीय नागरिक अटकेत आहेत. काही देशांमध्ये खासगी माहिती उघड न करण्याच्या कायद्यांमुळे विस्तृत माहिती मिळालेली नाही.