
पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याविषयी वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने २९ मार्च या दिवशी नवी देहली येथे पंतप्रधान मोदी यांची भेट घेत विशेष आभार मानले. या वेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या, तसेच गाथा देऊन आणि तुळशीहार घालून पंतप्रधान मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना श्रीक्षेत्र देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले.
या शिष्टमंडळात भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
विठ्ठल : एक महासमन्वय !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक