पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका उंचावणारे महामार्ग ठरतील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी !

केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

शंकराचार्यांची ही मूर्ती १२ फूट उंच आहे, तर तिचे वजन ३५ टन आहे. या वेळी पंतप्रधानांनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचेही लोकार्पण केले. हे समाधीस्थळ वर्ष २०१३ मधील जलप्रलयात उद्ध्वस्त झाले होते.

प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सैनिकांना कायम अनेक शुभेच्छा देत राहील ! – पंतप्रधान मोदी

प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. नौशेरा सेक्टर येथे दिवाळी साजरी करतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

प्रत्येक भारतीय दीपावलीच्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सैनिकांना कायम अनेक शुभेच्छा देत राहील ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी सीमेवर सैनिकांसमवेत साजरी केली दिवाळी करून भारतीय सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी स्थानिक धर्मगुरूंचे साहाय्य घ्या ! – पंतप्रधान मोदी यांचे जिल्हाधिकार्‍यांना आवाहन

केवळ लसीकरणासाठीच नव्हे, तर देशातील प्रत्येक समस्या आणि योजना यांसाठी हिंदूंच्या धर्मगुरूंचे साहाय्य घेतले, तर अधिकाधिक लाभ होईल, याचा विचार सरकारने करावा !

व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी प्रणाम करतो ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन हादरले आहे

दिवाळीपूर्वीची स्वच्छता !

राष्ट्रपती भवनातील थोडीथोडकी नव्हे, तर ४० लाख रुपयांची धारिकांची रद्दी विकण्यात आली आहे. जवळजवळ पावणे चौदा लाख धारिका या वेळी हटवण्यात आल्या आणि त्यामुळे ८ लाख ६ चौरस फूट जागा रिकामी झाली. ‘ही जागा ४ राष्ट्रपती भवन उभी राहू शकतील एवढी मोठी आहे’, असे म्हटले जात आहे.

पाटलीपुत्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणातील ४ धर्मांधांना ८ वर्षांनी फाशीची शिक्षा

मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !

अफगाणिस्तानातील काबुल नदीच्या पाण्याद्वारे अयोध्येतील राममंदिराच्या ठिकाणी जलाभिषेक !

अफगाणिस्तान येथून एका तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काबुल नदीचे पाणी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या स्थानावर जलाभिषेक करण्यासाठी पाठवले होते.

काँग्रेस पक्ष राजकारणाविषयी गंभीर नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक शक्तीशाली होणार ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

‘‘काँग्रेस पक्ष राजकारण गांभीर्याने घेत नाही. काँग्रेस पक्ष कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मग त्यासाठी देशाने का भोगले पाहिजे ?’’ – ममता बॅनर्जी