
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटक करण्यात आली आहे. व्यवस्थेच्या आधारे धाक निर्माण करणार्या पंतप्रधान मोदी यांना मी प्रणाम करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व्यक्त केली आहे.
मंत्रीमंडळातील संजय राठोड आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला आहे. ज्याने महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला सुरक्षित करायचे, अशाच माणसाला अटक झाल्याने समाजजीवन अस्थिर झाले आहे. याचप्रमाणे बाकीचेसुद्धा जे सुपात आहेत, ते जात्यात जातील आणि सर्वसामान्य माणूस आणखी आनंदी होईल, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोषी कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला शिक्षा मिळते. या कारवाईनंतर सर्वसामान्य माणूस सुखी होईल. देशमुख यांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन हादरले आहे. त्यांच्यासारख्या मोठा नेत्याने समाजासमवेत द्रोह केला, तर सामान्य माणसाने विश्वास तरी कुणावर ठेवायचा ? या अटकेनंतर भ्रष्टाचाराला सहन करणार नाही, प्रत्येक भ्रष्टाचारी माणसासाठी धाक निर्माण होईल, हा नरेंद्र मोदी यांचा संदेश सर्वांपर्यंत पोचला आहे.
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !